Jaikwadi Dam Rotation : जायकवाडी च्या डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू… | रब्बी हंगाम साठी एकूण दोन आवर्तन होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणाच्या डाव्या (Jaikwadi Dam Rotation) कालव्याव्दारे चालू वर्षाच्या रब्बी हंगामासाठी एकूण दोन पाणी आवर्तने सोडण्याचे नियोजन आहे त्यानुसार दिनांक 03 नोव्हेंबर रोजी दुपारी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे, अशी माहिती परभणी जिल्हा येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.

Jaikwadi Dam Rotation

 

यावर्षी जायकवाडी धरणात पाणीसाठा जेमतेम म्हणजे 47 टक्के एकवढाच झाला होता. तर, बैठकीतील ठरलेल्या निर्णायप्रमाणे रब्बी हंगाम साठी एकूण दोन आवर्तने सोडण्यात येणार होती. तर, दिनांक 03 नोवेंबर शुक्रवार रोजी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे.

 

तर, हे आवर्तन पुढील 4-5 दिवसांत परभणी येथे पोहचेल आणि याचा फायदा हा जिल्ह्यातील पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा, गंगाखेड या 5 तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो. तर, परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

 

दुसरे आवर्तन (Jaikwadi Dam Rotation)

 

दुसरे आवर्तन 20 जानेवारी 2024 रोजी सोडण्यात येईल आणि त्याचा कालावधी हा एकूण 25 दिवस राहील.

 

अधिक वाचा :

* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा

* नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ

* रब्बी पीक पेरा डाऊनलोड करा

* महाडीबीटी 01 नोव्हंबर सोडत यादी पहा

* “या” तीन जिल्ह्यांचा अग्रीम भरपाईचा मार्ग मोकळा

error: Content is protected !!