Panjab Dakh Havaman andaj : पंजाब डख हवामान अंदाज जून 2023 | June Weather Update
नमस्कार शेतकरी बांधवानो, राज्यामध्ये सर्व शेतकरी बांधव हे पावसाची अतुरतेने वाट पाहत आहेत. तर, आज दिनांक 01 जून 2023 रोजी पंजाबराव डख साहेब Panjab Dakh Havaman andaj यांच्याशी मोबाइल द्वारे झालेल्या संभाषनाद्वारे त्यांनी खालील प्रमाणे शेतकरी बांधवांना संदेश दिला आहे :
सर्व शेतकरी बांधवांनी शेतातील कामे आटपून घ्यावीत मान्सून केरळ मध्ये दाखल होत आहे. आणि 3 जून पासून उत्तर महाराष्ट्र पासून पावसाची सुरुवात होईल. Panjab Dakh Havaman andaj
उत्तर महाराष्ट्र मध्ये दिनांक 3,4,5,6 जून ला भाग बदलत पाऊस पडेल. राणामध्ये पाणी साचेल यासारखा हा पाऊस असेल.
मराठवाडा आणि विदर्भ मध्ये दिनांक 3 जून ते 10 जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडेल, यामध्ये 7, 8, 9 जून चा पाऊस हा मान्सून पाऊस असेल.
दिनांक 22 जून पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पाऊस पोहचेल. परंतु, शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील जमिनीची ओल ही 10 ते 12 इंच झाल्याशिवाय पेरणी करू नये.
जून मध्ये सर्वात जास्त पाऊस हा नगर, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, जालना, सातारा, सांगली, नांदेड, बीड, लातूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये होईल. या जिल्ह्यांमध्ये गतवर्षी च्या जून महिन्यापेक्षा आतापर्यन्त चा सर्वात जास्त पाऊस होईल.
नक्की वाचा : ऊस तोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज सुरू ….
अधिक वाचा :
* कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध झाला आहे….येथे पहा
* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?
* परभणी जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर