Krushi Sevak Bharti: राज्यात लवकरच कृषि सेवक भरती होणार | एकूण पदे 2070 | पहा काय आहे कृषि सेवक साठी पात्रता?
Krushi Sevak Bharti: कृषि आयुक्तालय, पुणे यांनी कृषि सेवक भरती संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे त्यानुसार राज्यामध्ये लवकरच कृषि सेवक भरती जाहिरात येण्याची शक्यता आहे. तर सर्व पात्र विद्यार्थ्यानी कृषि सेवक (Krushi Sevak Bharti) भरती साठी तयारीत राहावे याकरिता ही माहिती येथे देण्यात येत आहे. प्रसिद्धी पत्रक पुढीलप्रमाणे आहे ….
कृषि सेवक भरती प्रसिद्धी पत्रक
कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कृषी सेवक पद भरती संदर्भात शासन निर्णय दि.३१ ऑक्टोंबर, २०२२ नुसार ज्या विभाग /कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अद्याप मंजूर झालेला नाही, अशा विभाग /कार्यालयातील गट-अ, गट-ब व गट-क मधील (वाहनचालक व गट-ड संगवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत कृषी विभागाचा सुधारित आकृती बंध अद्याप अंतिम झालेला नसल्यामूळे या शासन निर्णयातील तरतूदी नुसार रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदभरती करता येणार आहे.
कृषी आयुक्तालयाचे अधिनस्त विविध गट-क संवर्गातील सरळसेवा पदभरती आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यास शासन मान्यता प्राप्त झालेली असून आय.बी.पी.एस.(IBPS) या संस्थेसोबत तसा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. तसेच कृषी विभागातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. (Krushi Sevak Bharti)
तसेच मा.राज्यपाल महोदयांच्या दि. २९.०८.२०१९ च्या अधिसूचनेनुसार अनुसूचित/ आदिवासी क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरणेबाबत कळविण्यात आले आहे, त्यामध्ये कृषी सहाय्यक (Krushi Sevak Bharti) संवर्गाचा समावेश आहे. शासन निर्णय सा.प्र.वि. दि. ०१/०२/२०२३ व दि.१०/०५./२०२३ नुसार विभागीय कृषी सहसंचालक ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व लातूर या विभागातील पेसा क्षेत्रातील मुख्यालय निश्चिती व पदसंख्या निश्चित करण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय विभागाची मान्यता प्राप्त करून घेणेबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. यास्तव कृषी सेवक पदांसाठी जाहिरात देणे शक्य झालेले नाही.
सद्यस्थितीत पेसा क्षेत्रातील पदे निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्याअंती निश्चित होणारी पदे यांचा विचार करून राज्यातील कृषी सहाय्यक (Krushi Sevak Bharti) यांची सरळसेवेच्या कोटयातील एकूण २५८८ रिक्त पदे विचारात घेता रिक्त पदांच्या ८० टक्के म्हणजेच २०७० एवढ्या या पदांवर कृषी सेवक म्हणून नियुक्ती देण्यासाठी पद भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
असे प्रसिद्धी पत्रक आयुक्त कृषी, कृषी आयुक्तालय, म. रा., पुणे यांनी जाहीर केले आहे.
कृषि सेवक पदसंख्या?
कृषि सेवक यांची एकूण 2070 पदांसाठी जाहिरात लवकरच येणार आहे.
कृषि सेवक साठी पात्रता?
शासन मान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठ मधील कृषि पदविका किंवा कृषि पदवी व तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण केलेले उमेदवार पात्र असतील.
कृषि सेवक वेतन?
कृषि विभागात कृषि सेवक म्हणून रुजू झाल्यानंतर मासिक वेतन हे रु.16000/- इतके राहील।
निवड झालेल्या उमेदवारांना पहिले तीन वर्ष हे कृषि सेवक म्हणून नियुक्ती देण्यात येईल आणि नंतर तीन वर्षाचा कालावधी समाधानक रित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना कृषि सहाय्यक पदी नियुक्ती देण्यात येईल.
अधिक वाचा :
* राज्यातील कृषि सेवकांची लवकरच मानधन वाढ होणार
* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा
* सोयाबीन चे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप 10 वाण
* “या” शेतकर्यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता
* रासायनिक खतांचे दरपत्रक पहीतले का?
* बियाणे खरेदी करताय..तर मग हे पहा