MahaDBT Cotton Shredder : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे कृषि विभागाच्या विविध योजना साठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात. यात फळ बाग लागवड, तुषार सिंचन, कृषि यंत्र औजारे , शेत तलाव इत्यादि. पोर्टल वर प्राप्त झालेल्या अर्ज मधून लक्षांक नुसार लाभार्थी शेतकरी यांची निवड केली जाते. तर, यात च आता एक नवीन योजनेची भर घालण्यात आलेली आहे ती म्हणजे “कापूस उत्पादकता अभियान अंतर्गत कपास क्रांती योजना.
केंद्र सरकार पुरस्कृत ‘कापूस उत्पादकता अभियानअंतर्गत (कपास कांती )’ २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना कॉटन श्रेडर उपलब्ध करून देण्यासाठी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कापूस शेतीत यांत्रिकीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने या नव्या घटकाचा योजनेत प्रथमच समावेश करण्यात आला आहे.
या योजनेला केंद्र शासनाने पुढील पाच वर्षांसाठी मान्यता दिली असून, कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या धर्तीवर या घटकाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांना घेता येणार आहे. (MahaDBT Cotton Shredder )
कॉटन श्रेडर (Cotton Shredder) यंत्र बाबत ?
कॉटन श्रेडर (Cotton Shredder) हे कापूस काढणीनंतर शेतात उरलेल्या पऱ्हाट्या (Cotton Stalks) बारीक करून जमिनीत मिसळण्यासाठी वापरले जाणारे कृषी अवजार आहे. यामुळे पऱ्हाट्या जाळण्याची गरज राहत नाही आणि बोंडअळीच्या जीवनचक्रावरही नियंत्रण मिळण्यास मदत होते. MahaDBT Cotton Shredder
मुख्य फायदे:
- कापसाच्या पऱ्हाट्या जलद बारीक होतात.
- सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळल्याने जमिनीची सुपीकता वाढते.
- गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते.
- मजुरी व वेळेची बचत होते.
मिळणारे अनुदान ?
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती : यंत्राच्या 50% किंवा जास्तीत जास्त रु. 75,000/-
इतर लाभार्थी : यंत्राच्या 40% किंवा जास्तीत जास्त रु. 60,000/-
महाडीबीटी पोर्टलवर ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याने इच्छुक शेतकऱ्यांनी विलंब न करता ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
अर्ज कसा करावा ?
महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून कृषि यांत्रिकीकरण घटका मध्ये खालील प्रमाणे पर्याय निवडून अर्ज सादर करावा.

* कर्जमाफी मध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण बंधनकारक
* खाद्यपदार्थांत भेसळ आढळल्यास काय करावे? आता अशी करता येणार तक्रार?
* राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर….
* असा भरा तुमचा एसआयआर फॉर्म? मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण
* शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार? | मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा
* शेतकर्यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना
* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार
