PAHSKY karjmafi : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी बुधवारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात जाहीर केली. या पहिल्या यादीत केवळ ५३३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांची यादी प्राप्तिकर विभागाकडून मागवली असून ती अद्याप प्राप्त झाली नाही. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या ५३३ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. लाभार्थ्यांना २ कोटी ९९ लाख ३७ हजार ५४० रुपये कर्जमुक्तीचा लाभ मिळेल. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर होतील. PAHSKY karjmafi
एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ
राज्यात ३२ लाख शेतकरी थकबाकीदार असून ४ लाख नियमित कर्जपरतफेड करणारे शेतकरी आहेत. एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. २,९०,००० शेतकऱ्यांचे दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे. त्यांना ३१ मार्च २०२७पर्यंत कर्ज भरण्याची मुदत दिली आहे. PAHSKY karjmafi
शेतकऱ्यांना करावे लागेल आधार प्रमाणीकरण
1. यादीत नाव आल्यानंतर शेतकऱ्यांना आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे.
2. ज्यांचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी झाले नसेल त्यांचे फार्मर आयडी या केंद्रावर करावे लागेल.
वरील दोन प्रक्रिया झाल्या की पैसे जमा होणार आहेत.
* खाद्यपदार्थांत भेसळ आढळल्यास काय करावे? आता अशी करता येणार तक्रार?
* राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर….
* असा भरा तुमचा एसआयआर फॉर्म? मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण
* शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार? | मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा
* शेतकर्यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना
* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार
