Food Adulteration Complaint : अन्न व औषध प्रशासन आयुक्त माननीय श्री तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यभरात कारवायांचा सपाटा लावला आहे. अन्नपदार्थांत भेसळ करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांची कोणतीही गय केली जाणार नाही, अशा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यांच्या या कारवायांचे अनेकांनी समर्थक केले असून, त्यामुळे भेसळखोर आणि गुटखामाफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. राज्यात कुठेही भेसळयुक्त खाद्यपदार्थ किंवा निकृष्ट दर्जाची औषधे आढळल्यास थेट एफडीकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. यादरम्यान तक्रार करायची झाल्यास ती कशी करावी? असा प्रश्न समाजमाध्यमांवर विचारला जाऊ लागला आहे, तर आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत.
माननीय आयुक्त श्री तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार कशी करावी?
नागरिकांचा सहभाग, तंत्रज्ञानाची ताकद आणि प्रशासनाचे उत्तरदायित्व यांचा संगम घडवून सार्वजनिक आरोग्य संरक्षण अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक तक्रार महत्त्वाची आहे. कारण- प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे. अन्न असो किंवा औषध, फक्त बोला — तक्रार आपोआप तयार होईल. भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट, निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत तक्रार नोंदविणे आता अत्यंत सोपे झाले आहे. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासनाच्या AI-आधारित व्यासपीठावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत बोला — तुमची तक्रार स्पष्ट व पूर्ण मुद्द्यांत आपोआप तयार होईल. अन्न सुरक्षा असो वा औषध सुरक्षा — दोन्ही तक्रारींसाठी एकच व्यासपीठ आहे. यादरम्यान नागरिकांना आपली तक्रार नोंदविण्यासाठी मुंढे यांनी https://complaints.mahafda.in ही अधिकृत वेबसाईटही शेअर केली. या साईटवर जाऊन एका क्लिकवर तक्रार सबमिट करा आणि तिची स्थिती ट्रॅक करा. तुमची जागरूकता म्हणजेच सर्वांची सुरक्षा. आजच तक्रार नोंदवा, असे आवाहन त्यांनी केले आहे. Food Adulteration Complaint
ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची पद्धत
1. अन्न व औषध विभागाच्या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून घरबसल्या भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तक्रार करता येते. त्यासाठी https://complaints.mahafda.in या ऑनलाईन संकेतस्थळाला भेट द्या.
2. मुख्यपृष्ठावर “तक्रार नोंदवा” या बटणावर क्लिक करा. तिथे तुमचा १० अंकी मोबाईल क्रमांक टाका. वन-टाईम पासवर्ड (OTP) टाकून पडताळणी पूर्ण करा.
3. त्यानंतर तक्रारीचा प्रकार (जसे की – भेसळयुक्त अन्न, कालबाह्य (Expired) उत्पादन, निकृष्ट दर्जाचे औषध, बनावट औषध, चुकीचे लेबलिंग, अस्वच्छता, इतर FDA संबंधित तक्रार) निवडा. त्यानंतर तक्रारीची सविस्तर माहिती भरा. त्यात दुकान/हॉटेल/कंपनीचे नाव, पूर्ण पत्ता, घटनेची तारीख व वेळ, उत्पादनाचे नाव, बॅच क्रमांक (असल्यास) काय समस्या आढळली याचे स्पष्ट वर्णन जोडा. शक्य असल्यास उत्पादनाचे फोटो, बिलाची प्रत, व्हिडीओ, पॅकेजिंगचे फोटो, इतर संबंधित पुरावे यांसारखे पुरावे अपलोड करा. घटना ज्या ठिकाणी घडली, ते ठिकाण नकाशावर किंवा पत्त्याद्वारे नमूद करा. सर्व माहिती तपासून Submit बटनावर क्लिक करा. त्यानंतर प्राप्त झालेला तक्रार क्रमांक जतन करून ठेवा. Food Adulteration Complaint
* राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर….
* असा भरा तुमचा एसआयआर फॉर्म? मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण
* शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार? | मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा
* शेतकर्यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना
* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार
* नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा
* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू
