Loan Waiver Beneficiary List : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे काम सुरु झाले आहे. सहकार विभागाने १७ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यांना १३000 कोटी रुपये देत आहोत. आता दुसऱ्या यादीचे काम सुरु आहे. पहिल्या यादीतील जे शेतकरी आहेत त्यांच्या गावांमध्ये कर्जमाफीच्या याद्या जात आहेत. त्याची तत्काळ पडताळणी करुन ३१ तारखेपूर्वीच १७ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. Loan Waiver Beneficiary List
पंढरपूर येथे शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा कृतज्ञता शेतकरी मेळावा आणि सत्कार कार्यक्रमात बोलताना त्यांनी कर्जमुक्ती योजनेच्या प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी पंढरी – २०२६’ कृषी महोत्सवाचेही उदघाटन केले. Loan Waiver Beneficiary List
आज सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आणि त्यांना कर्जमुक्त केले. त्यांना आता नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र केले. आज त्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. तसेच त्यांना नवीन कर्जाचे वाटपदेखील केले. सर्व जिल्ह्यांमध्ये असे कार्यक्रम करु, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. Loan Waiver Beneficiary List
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ज्यांनी नियमित कर्ज भरले त्यांच्यासाठी ५० हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करत आहोत. बँकाडून आलेल्या सर्व आकडेवारीची पडताळणी करावी लागते. त्याला थोडा वेळ लागतो. आम्ही कर्जमाफीच्या योजनेत एकही शेतकरी मागे राहू देणार नाही. सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. आज पांडुरंगाच्या चरणी याची सुरुवात केली आहे, असे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
कर्जमाफी याद्या ह्या आपण आपल्या कर्ज असलेल्या बँकेत पाहू शकता, किंवा पुढील आठवड्यात आपल्या गावा मध्ये ग्रामपंचायत स्तरावर देखील ह्या याद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
माननीय मुख्यमंत्री यांचे x माध्यमावरील पोस्ट :

* कर्जमाफी मध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण बंधनकारक
* खाद्यपदार्थांत भेसळ आढळल्यास काय करावे? आता अशी करता येणार तक्रार?
* राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर….
* असा भरा तुमचा एसआयआर फॉर्म? मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण
* शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार? | मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा
* शेतकर्यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना
* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार
