Agricultural Insurance : या जिल्ह्यातील शेतकर्यांना आजपासून पीक विमा वितरण | पीक विमा अग्रिम रक्कम
राज्यामध्ये पावसातील खंडा मुळे पिकाच्या उत्पादनात होणारी घट पाहता जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा (Agricultural Insurance) अग्रिम मंजूर करण्यात आला होता आणि त्याबाबतचे आदेश देखील विमा कंपनी ला देण्यात आले होते.
राज्यातील कोल्हापूर, परभणी, सांगली, बुलडाणा, जालना आणि नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये अग्रीम भरपाईबाबत संपूर्ण तोडगा निघाला असून द्यावयाची अग्रिम रक्कम बाबतची पूर्ण निर्णय झाला आहे आणि कंपनीने देखील या जिल्ह्यांमध्ये पीक विमा (Agricultural Insurance) अग्रिम रक्कम देण्यासाठी तयारी दर्शविली आहे.
तर, वरील पैकी आज दिनांक 8 नोव्हेंबर पासून परभणी जिल्ह्यातील शेतकर्यांना सोयाबीन पिकाचा पीक विमा (Agricultural Insurance) अग्रिम रक्कम वितरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कृषि विभागातील अधिकारी यांनी दिली आहे.
तर परभणी जिल्ह्यातील एकूण 52 महसूल मंडळातील पीक विमा धारक शेतकर्यांना आज पासून पीक विमा अग्रिम रक्कम वितरण सुरू होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील 4 लाख 41 हजार सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना लाभ मिळणार आहे.
मंडळ निहाय मंजूर अग्रिम Agricultural Insurance
महसूल मंडळ निहाय मिळणारी अग्रिम रक्कम पाहण्यासाठी खालील पेज वरती भेट द्या :
मंडळ निहाय मंजूर अग्रिम रक्कम पहा
अधिक वाचा :
* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा
* नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ
* महाडीबीटी 01 नोव्हंबर सोडत यादी पहा
* “या” तीन जिल्ह्यांचा अग्रीम भरपाईचा मार्ग मोकळा