Kusum Mahaurja: परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 2990 सोलर पंप बसविण्यात आले | PM Kusum Yojana | ऑनलाइन अर्ज सुरू असून अर्ज करण्याचे आवाहन
Kusum Mahaurja: प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना म्हणजेच पीएम कुसुम अंतर्गत राज्यातील शेतकर्यांना 90%/95% अनुदानावरती सोलर पंप बसवून देण्यात येत आहेत. यासाठी 2021 पासून राज्य मध्ये महाऊर्जा संकेतस्थळावर Kusum Mahaurja अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. सद्यस्थिति मध्ये नवीन कोटा उपलब्ध करू 17 मे पासून महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने सोलर पंप साठि नोंदणी सुरू आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये 2021 पासून आज पर्यंत एकूण 2990 सौर पंप हे शेतकर्यांच्या शेतावरती बसविण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यातून सोलर पंप साठी खूप मागणी असून शेतकर्यांचा या योजणेस चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये आज पर्यंत आलेल्या ऑनलाइन एकूण अर्जापैकी 64,792 अर्ज हे परिपूर्ण आहेत आणि आजपर्यंत एकूण 2990 पंप हे शेतकर्यांच्या शेतावरती बसविण्यात आले आहेत. आणि ही ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू असून शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे महाऊर्जा जिल्हा व्यवस्थापक यांनी संगितले आहे.
परभणी जिल्ह्यातील तालुका निहाय लाभ घेतलेल्या शेतकर्यांची संख्या :
परभणी : 590
जिंतुर : 248
गंगाखेड : 68
सेलू : 393
पूर्णा : 1121
सोनपेठ : 2
पालम : 61
मानवत : 232
पाथरी : 361
ऑनलाइन अर्ज Kusum Mahaurja करण्यासाठी : येथे भेट द्या
अधिक वाचा :
* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा
* सोयाबीन चे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप 10 वाण
* “या” शेतकर्यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता
* रासायनिक खतांचे दरपत्रक पहीतले का?
* बियाणे खरेदी करताय..तर मग हे पहा
* कृषि विद्यापीठ मध्ये जिवाणू खते विक्री साठी उपलब्ध
* मध्यवर्ती रोपवाटिका फळझाडे (कलमे) विक्री सुरू झाली
* कुसुम सोलर पंप अर्ज करा फक्त रु. 15/- मध्ये …