MahaDBT Subsidy : महाडीबीटी च्या ट्रॅक्टर आणि इतर औजारे यांच्या अनुदान रकमेत वाढ | आता मिळणार इतके अनुदान?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण (MahaDBT Subsidy) घटक साठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. आणि या ऑनलाइन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत काढली जाते. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

 

Mahadbt Subsidy Hike

 

 

महाडीबीटी सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे MahaDBT Subsidy त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक अपलोड करावे लागते आणि त्यानंतर पूर्वसंमती आणि पुढे अनुदान रक्कम अदा करणे असे टप्पे महाडीबीटी मध्ये आहेत.

 

 

महाडीबीटी द्वारे शेतकर्‍यांना कृषि यांत्रिकीकरण घटका मध्ये जी अनुदान रक्कम MahaDBT Subsidy दिली जाते त्यामध्ये आता खूप मोठा बादल करण्यात आला असून या अनुदान च्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे.

 

 

कृषि यांत्रिकीकरण घटका अंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारे, पॉवर टिल्लर बाबींच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये ट्रॅक्टर 2WD ( 40 PTO एचपी किंवा अधिक) चे कमाल अनुदान मर्यादा ही 1.25 लाख वरुण आता 4.25 लाख रुपये (खरेदी किंमतीच्या 50% मर्यादेत) इतकी मंजूर करण्यात आली आहे. तसेच, ट्रॅक्टर च्या इतर मॉडेल मध्ये देखील अनुदान मर्यादा ही वाढविण्यात आली आहे.

 

 

महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण अनुदान वाढ बाबत

 

Mahadbt Subsidy Hike New.jpg

 

 

कधी होणार कृषि यांत्रिकीकरण सोडत? MahaDBT Subsidy

 

निधि अभावी मार्च 2023 पासून कृषि यांत्रिकीकरणाची नवीन सोडत काढण्यात आलेली नाहीये परंतु आता निधि प्राप्त झाल्यानंतर सोडत पूर्वीप्रमाणे काढण्यात येतील.

 

 

 

अनुदान बदल बाबत चे परिपत्रक 

 

Tractor Subsidy

 

 

 

Mahadbt Subsidy Tractor

 

 

अधिक वाचा :

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा

* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?

* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र

error: Content is protected !!