Pik Vima : रब्बी पीक विमा भरण्यास मुदतवाढ | आता ही आहे अंतिम मुदत
Pik Vima: सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.1 भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन 2023-24 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
सदर योजना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरीता शेतक-यांना केवळ रु.1 भरुन पीक विमा Pik Vima योजनेचा लाभ घेण्यास मान्यता देण्यात आली होती.
खरीप हंगामाप्रमाणे राज्यात रब्बी हंगामातही 1 रुपयात पीक विमा Pik Vima योजना राबवण्यात येत आहे, रब्बी पीक विमा योजना मध्ये ज्वारी, गहू, मका, हरभरा या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
पीक विमा योजना मध्ये कोकणातील आंबा आणि सर्व राज्यातील काजू, संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 असा होता. मात्र पीक विमा पोर्टल मध्ये काही तांत्रिक अडचणी मुळे राज्यातील काही इच्छुक शेतकरी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत. तर, यामुळे बरेच शेतकरी हे शासनाकडे मुदतवाढ करण्याविषयी विचारणा करत होते त्यानुसार आता पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
Pik Vima मुदतवाढ
तर, आता रब्बी पीक विमा भरण्यासाठी खालील प्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे :
रब्बी ज्वारी : 4 आणि 5 डिसेंबर 2023
कोंकणातिल आंबा : 4 आणि 5 डिसेंबर 2023
संत्रा : 4 आणि 5 डिसेंबर 2023
काजू : 4 आणि 5 डिसेंबर 2023
तर, वरील पिकांचा शेतकरी बांधवांनी 4 व 5 डिसेंबर रोजी पीक विमा भरून योजणेत सहभागी व्हावे. तसेच, इतर हरभरा आणि गहू पिकांसाठी ही मुदत 15 डिसेंबर 2023 पर्यन्त आहे.
रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा
अधिक वाचा :
* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक
* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान
* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस
* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात
* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?
* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा
* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा
* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?
* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश
* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र