PM Kisan Yojana : पीएम किसान चा निधि वाढणार? | मानधनात होणार “इतक्या” रुपयांची वाढ?
PM Kisan Yojana : पुढील येत्या अर्थसंकल्पात सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे ती म्हणजे सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकर्यांना केंद्र शासनाकडून पीएम किसान योजनेअंतर्गत आता 6000 रुपये वरुण 8000 रुपये मिळणार असल्याची माहिती वर्तवण्यात येत आहे आणि ही सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आसेल. (PM Kisan Yojana)
PM KISAN yojana
देशभरात केंद्र सरकार कडून पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM KISAN yojana) सन 2019 पासून राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतराने म्हणजे रु. 2000 चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.
सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजनेच्या रक्कमेत वाढ करण्याची शक्यता होती परंतु तसे झाले नाही. तर, आता या महिन्याच्या शेवटी अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. तर, या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. तर प्रमुख्याने शेतकऱ्यांसाठी सन्मान निधि योजनेतील अनुदानामध्ये 2000 रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. तर, ही वाढ करण्यात आली तर शेतकर्यांना पीएम किसान सन्मान निधि योजनेतून वार्षिक एकूण 8000/- रुपयांची मदत मिळणार आहे. (PM Kisan Yojana)
* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज
* महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात अत्यंत महत्वाची सूचना
* सोयाबीन पिवळे पडतेय? मग असे करा एकात्मिक व्यवस्थापन | सोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस)
* पीक पेरा खरीप 2024 PDF डाऊनलोड करा | पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf | Pik pera form pdf format
* महाडीबीटी तुषार, ठिबक लॉटरी यादी डाऊनलोड करा | जून 2024 सोडत यादी