MahaDBT Farmer : महाडीबीटी अंतर्गत ट्रॅक्टर आणि इतर औजारे साठी किती अनुदान मिळणार? अनुदान वाढ कधीपासून लागू होणार?
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (MahaDBT Farmer) द्वारे कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटक साठी ऑनलाइन सोडत यादी काढण्यात आली असून या सोडत मध्ये शेतकर्यांना नवीन अनुदान लागू होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.
MahaDBT Farmer
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल MahaDBT Farmer द्वारे कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटक साठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात आणि या ऑनलाइन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत काढली जाते. परंतु, सध्या महाडीबीटी च्या अंतर्गत कृषि यंत्राचे अनुदान वाढ करण्याबाबत कृषि आयुक्तालय यांच्याकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे त्यामध्ये कृषि यांत्रिकीकरण घटकांचे अनुदान रकमेत वाढ करण्यात आली आहे. परंतु, सध्या जो महाडीबीटी ची सोडत झाली आहे त्यामध्ये मात्र पूर्वी प्रमाणेच अनुदान दाखविले जात आहे त्यामुळे शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे कि ट्रॅक्टर साठी किती अनुदान मिळणार? तर याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
कृषि आयुक्तालय यांच्या परिपत्रक नुसार महाडीबीटी MahaDBT Farmer द्वारे शेतकर्यांना कृषि यांत्रिकीकरण घटका मध्ये जी अनुदान रक्कम दिली जाते त्यामध्ये खूप मोठा बादल करण्यात आला असून या अनुदान च्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. परंतु, ही अनुदान वाढ सद्यस्थीती मध्ये लागू करण्यात आली नसून पुढील काही दिवसात लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. कारण, दिनांक 11 डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या सोडत मध्ये कृषि यांत्रिकीकरण घटकांना पूर्वी प्रमाणेच अनुदान रक्कम लागू आहे.
कृषि आयुक्तालय यांच्या परिपत्रक नुसार अनुदान वाढ बाबत महाआयटी कंपनीला अनुदान रक्कम व नवीन औजारे समाविष्ट करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तर, महाडीबीटी पोर्टल द्वारे अनुदान रकमेत केल्यानंतर च ही अनुदान वाढ लागू होईल असे यावरून कळते.
कृषि यांत्रिकीकरण : सोडत यादी पहा
अधिक वाचा :
* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा
* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज
* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान
* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक
* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान
* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस
* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात
* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?
* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा
* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा