Fruit Crop Insurance: “या” जिल्ह्यात सन 2022-23 चा फळपीक विमा मिळण्यास सुरुवात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

राज्यामध्ये शेतकर्‍यांना त्यांच्या पिकासाठी सरक्षण मिळावे (Fruit Crop Insurance) करिता प्रधानमंत्री फसल बिमा योजना राबविली जात आहे. तर, जळगाव जिल्ह्यातील  सन 2022-23 मध्ये सुमारे ७७ हजार ५०० शेतकरी हे फळ पीकविमा योजनेत सहभागी झाले. या शेतकऱ्यांनी गतवर्षी पीक विमा योजना अंतर्गत केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते.

Fruit Crop Insurance

 

जळगाव जिल्ह्यातील  केळी पिकाचा पीक विमा Fruit Crop Insurance भरलेल्या शेतकर्‍यांची पीक पडताळणी व इतर जी आवश्यक कार्यवाही विमा कंपनी कडून करणे आवश्यक होते ते वेळेत न केल्याने विमा भरलेल्या शेतकर्‍यांना नुकसान होऊन देखील परतावा मिळण्यास अडचण झाली होती.

 

 

परंतु, शासनाने आदेश दिल्यानंतर विमा कंपनीने सॅटेलाइट व एम आर साक यांच्या माहितीचा उपयोग करून जळगाव जिल्ह्यातील केळी पिकाची पडताळणी केली. परंतु, यात 77 हजार विमा अर्जा पैकी जवळपास 53 हजार शेतकर्‍यांचे विमा प्रस्ताव हे मंजूर केले.  मंजूर केलेल्या पैकी 42 हजार शेतकर्‍यांचे विमा परतावे हे दिवाळी कालावधी मध्ये जमा करण्यात आले परंतु, जवळपास 12 हजार शेतकर्‍यांचे प्रस्ताव हे मंजूर असून देखील विमा परतावा (Fruit Crop Insurance) देण्यात आला नव्हता.

 

 

तर, गुरुवार पासून उर्वरित 12 हजार शेतकर्‍यांचे केळी फळ पीक विमा (Fruit Crop Insurance) परतावे मिळण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, उर्वरित प्रस्ताव वरती देखील सकारात्मक तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

 

अधिक वाचा :

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा

* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?

* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र

* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर

* या दिवशी मिळणार 15 वा हाफता

* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24

* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा

error: Content is protected !!