Maharashtra Drought : राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिति जाहीर | महसूल मंडळ यादी 2023
राज्यामध्ये दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील एकूण ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ (Maharashtra Drought) घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळून आले आहे. या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक ९ नोव्हेंबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून तेथे सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकार कडून घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ घोषित (Maharashtra Drought) केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मि.मि. पेक्षा कमी झाले आहे अशा एकूण १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून खालील प्रमाणे सवलती लागू करण्यास शासनाने दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णया द्वारे मंजूरी दिली आहे.
दुष्काळी मंडळांमध्ये लागू सवलती (Maharashtra Drought)
१) जमीन महसूलात सूट.
२) पिक कर्जाचे पुनर्गठन.
३) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती.
४) कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट.
५) शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी.
६) रो ह यो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.
७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर.
८) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.
दुष्काळी महसूल मंडळे यादी
दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे दुष्काळ सदृश परिस्थिति असलेले राज्यातील 1021 महसूल मंडळे यांची यादी पहाण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडावा
दुष्काळी महसूल मंडळे यादी : डाऊनलोड करा
शासन निर्णय
दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजीचा (Maharashtra Drought) “राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागु करण्याबाबत.”
अधिक वाचा :
* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र
* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर
* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24
* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा
* नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ
* महाडीबीटी 01 नोव्हंबर सोडत यादी पहा